Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

घरच्या घरी अभ्यास करून "शुभांगी जगताप "झाली मुंबई येथे कार्यकारी- सहाय्यक अधिकारी-- हिंगणगाव ग्रामस्थांनी केला तिचा नागरिक सत्कार


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

 इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील कन्या शुभांगी बाळू जगताप हिने जिद्द, आत्मविश्वास आणि स्वतःच्या मेहनतीच्या बळावर घरच्या घरी अभ्यास करून बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी पदास गवसणी घातली. तिच्या या उल्लेखनीय यशा बद्दल ग्रामस्थांच्या वतीने तिचा नागरी सत्कार करण्यात आला. शुभांगीने सनदी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून शिव, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचा व स्वामी विवेकानंदांच्या

प्रेरणादायी तत्त्वांचा आधार घेत अभ्यास केला. विशेष म्हणजे, तिने बाहेरगावी किंवा शहरात न जाता कोणतीही शिकवणी न लावता घरच्या घरीच जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशस्वी प्रवासात आई, वडील, बहिणी, मावशी, काकांचे तिला अनमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 

 हा सन्मान माझा नसून संपूर्ण हिंगणगावचा असून मी सर्व आयोजक यांची ऋणी राहीन, असे भावनिक उद्गार शुभांगीने कृतज्ञतेने काढले. सत्कार सोहळ्याला इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजय देवकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर चोरमले, राजेंद्र आबा देवकर, सचिन देवकर, लक्ष्मण आसबे, तुषार जगताप, निखिल देवकर, प्रदीप देवकर, पांडुरंग जगताप, सतीश जगताप, आप्पा आरडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा