Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

मक्का मदीना येथील" उमराह" यात्रेसाठी इंदापूर शहरातून सामाजिक कार्यकर्ते व त्यांचे कुटुंब रवाना इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने सत्कार संपन्न


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी 

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

 मुस्लिम धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र समजली जाणाऱ्या पवित्र मक्का मदिना येथील हाज - उमरा यात्रेसाठी इंदापूर शहरातून सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई नबीलाल आतार, सौ. सायराबी हमीद आतार व त्यांची कन्या सानिया हमीद आतार हे रवाना झाले. यानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या पुढाकाराने त्यांचा नागरी सत्कार करून त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, सोनाई दूध संघाचे संस्थापक संचालक प्रवीण माने, पत्रकार संघाच्या वतीने धनंजय कळमकर पाटील, श्रीयश नलवडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 यासंदर्भात सत्कारमूर्ती हमीद आतार म्हणाले, उमराह, ज्याला इस्लाम धर्मात 'छोटा हज' असेही संबोधले जाते, ही मक्का येथे केली जाणारी एक महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सुन्नतनुसार केली जाते. उमराहमध्ये विशेष धार्मिक विधींचा समावेश आहे, ज्यामध्ये अहेराम (विशेष कपडे) परिधान करणे, काबा शरीफची सात वेळा परिक्रमा (तवाफ) करणे, नमाज अदा करणे' लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक' ही प्रार्थना म्हणणे, सफा आणि मरवा या दोन टेकड्यांदरम्यान सात वेळा धावणे आणि केस कापणे यांचा समावेश आहे. या सर्व विधींमुळे उमराहला इस्लाममध्ये विशेष स्थान आहे.



 इंदापूर शहर व परिसरात हमीद आतार व त्यांच्या पत्नी सायराबी आतार यांचे मोठे सामाजिक कार्य आहे. शेकडो कुटुंबांना त्यांनी आत्मनिर्भर होण्यास मदत केली असून त्यांच्या पुढाकाराने पर्यावरण संतुलन करण्यासाठी पाच हजार हून जास्त वृक्षारोपण करण्यात आले आहे. इंदापूर येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा चांगला लोकसंपर्क असून ते हाज-उमरा या पवित्र यात्रेस जाणार असे समजल्यानंतर इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.

 इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मायाताई विंचू व अलकाताई ताटे, माजी नगरसेवक ॲड. गिरीष शहा व शेखर पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे व अविनाश कोथमिरे,

सामाजिक कार्यकर्ते महादेव चव्हाण, भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, आपला मेंबर ग्रूपचे अनिल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दगडू सिद, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा प्रतिनिधी गफूर सय्यद, फकीर पठाण, इंदापूर पतंजली योग समितीचे रविंद्र परबत सर, गुंड गुरुजी, संतोष देवकर, संतोष जामदार, हाजी सलीम भाई बागवान, नासिरभाई, सचिन पलंगे, नानासाहेब देवकर, अशोक अनपट, सचिन चौगुले, सिकंदर बागवान, चांद पठाण, अमोल खराडे, अजय बारसे, हाजी अस्लमभाई बागवान, अशोक ननवरे यांच्यासह बहुसंख्य इंदापूरकर नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा