Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

क्विक हिल फाउंडेशन व सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यावतीने विद्यार्थिनींना "सायबर सुरक्षा "बाबत मार्गदर्शन


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

क्विक हील फाउंडेशन’ व सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या वतीने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत निरामयी एनजीओ येथे झोपडपट्टी भागातील मुलींसाठी सायबर सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रामध्ये मधुरा समीर लाकडे आणि पूर्वा नितीन वीर यांनी मुलींना सुरक्षित पासवर्डचा वापर, फिशिंग ( फसवणूक मेल ), ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धती, सुरक्षित ब्राउझिंगचे नियम तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले तसेच antifraud.ai या ॲपबद्दल त्यांनी सविस्तर माहिती देऊन हे ॲप कसे प्रत्यक्ष डाउनलोड करायचे हे शिकवून सर्वांकडून ॲप डाउनलोड करून घेतले. 



वाढते सायबर क्राईम रोखण्यासाठी

संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्रामुळे मुलींमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली. संस्थेच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा