Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

अकलूज पोलीसांची आणखी एक कौतुकास्पद कारवाई पोलिस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या ३ मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त.


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

अकलुज पोलीस ठाणे हददीतील चोरीला गेलेल्या ३ मोटार सायकल जप्त केल्यास अकलुज पोलीस स्टेशनकडील पोलीसाची कारवाई कौतुकास्पद आहे 

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की


दिनांक ०९/०८/२०२५ रोजी रात्री ०८.३० वाचे सुमारास हरीनगर माळीनगर तालुका माळशिरस येथुन यांची चोरीला गेलेली मोटार सायकल असलेबाबत अकलुज पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरटयाविरुध्द तकार दिलेली होती. अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२५ बीएनएस ३०३ (३) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकों/१०९८ व्ही. बी. घाटगे हे करित होते अकलूज पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहेको १०९८ घाटगे पोहेकी/१५६ साले, पोकों/५१ मा हे अकलूज शहरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की पंचवटी येथील एक इसम नामे शंकर सुनील डांगे याव्याकडे चोरीच्या गाड्या आहेत अशी माहिती मिळाली मिळाले असता शंकर सुनील डांगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खालीलप्रमाणे वाहने काढून दिली.


१) अकलूज पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२५ मधील एक होन्डा ड्रीम योगा कंपनीची मोटारसायकल आरटीओ एमएच ४५ ही ४६५१ असा असलेली जु. वा.


२) अकलूज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १६१/२०२५ एक होन्डा कंपनीची युनीकॉर्न काळ्या रंगाची मोटारसायकल तीचा आरटीओ एमएच ४५ ए जी १८८३ असा असलेली जु वा.


३) धाराशिव येथून चोरलेली एक टीव्हीएस कंपनीची अपाचे काळा रंगाची मोटरसायकल तिचा आरटीओ क्रमांक एमएच २५ एप्त ०१५३ असा असलेली गु.वा.



सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण मा. पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज . संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, पोसई कदम, पोहेको शिवकुमार सदभावी पोहेकों/ विक्रम घाटगे, पोहेकों/विनोद साठे, पोहेको / २११ रणनवरे पोलीस अर्मलदार रणजित जगताप, सायबर सेलवे जुबेर तांबोळी यांनी कामगिरी केली आहे



पोलीस निरिक्षक

अकलूज पोलीस ठाणे अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा