संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर : शिवसेनेच्या तुळजापूर शहर संघटकपदी दिव्यांग व निष्ठावंत कार्यकर्ता नितीन मस्के यांची निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते मस्के यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली. या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवसैनिक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले नितीन मस्के यांनी आपले अपंगत्व कधीही आडवे येऊ दिले नाही. पक्षाच्या कामात सतत सक्रिय राहून लोकांशी संपर्क साधत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या निष्ठावान कार्याची दखल घेत तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी पक्षश्रेष्ठींना शिफारस केली होती. अखेर त्यांच्या शिफारशीला मान देत शहर संघटकपदाची जबाबदारी मस्के यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
या नियुक्तीमुळे सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत असून “अनाथांचे नात” ही एकनाथ शिंदे यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. दिव्यांग कार्यकर्त्याला पक्षात इतक्या मोठ्या पदावर संधी मिळणे ही ऐतिहासिक बाब असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना नितीन मस्के म्हणाले,
"पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या दिव्यांग कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत मला एवढ्या मोठ्या पदाची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशी ग्वाही मी देतो."
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मस्के यांच्या नेतृत्वामुळे तुळजापूर शहरात शिवसेनेची संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शिवसेना पक्षाचे उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,संजय लोंढे,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,मीनाताई सोमाजी,सौरभ भोसले,मयूर कदम,गणेश पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा