इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
भारतीय ऋषी परंपरे तील योग जगभर पोहोचवण्याचे कार्य भारताचे लोकप्रिय जगप्रसिद्ध पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. जीवन निरोगी व यशस्वी करायचे असेल तर प्रत्येकाने नियमितपणे योग, प्राणायाम आणि ध्यान अंगीकारले पाहिजे. ७५व्या वर्षीही नरेंद्र मोदीजी यांची कार्यक्षमता, तेजस्विता आणि ओजस्विता ही योगसाधनेचेच फलित असल्याने योग आणि प्राणायाम ही सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रवीणभैय्या माने यांनी व्यक्त केले.
इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित भव्य योगशिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमात होमहवन आणि सामूहिक सूर्यनमस्कार संपन्न झाले.
इंदापूर नगरपालिके जवळील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या शिबिरात शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक, महिला, युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराद्वारे उपस्थितांनी निरोगी जीवनाचा संकल्प केला. योगाभ्यासाचे मार्गदर्शन प्रशांत गिड्डे आणि रामेश्वर साठे यांनी केले.
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारताने जगभरात वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यांच्या प्रेरणेतून योगसंस्कृतीचा जागर सर्वदूर होत असल्याचे यावेळी प्रविणभैय्या माने यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, पतंजली योग समितीचे पदाधिकारी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शांतिपाठ व सामूहिक आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रास्ताविक भालचंद्र भोसले यांनी तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र परबत यांनी केले. आभारप्रदर्शन समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा