Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

प्रा. आनंदा डावरे यांचा 'शेतशिवार' कवितासंग्रह कृषीसंस्कृतीचा उत्कट उद्घोषः - डॉ. बाबुराव उपाध्ये


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

अकोले येथील 'आंतरभारती' चे प्रा. आनंदा काळू उर्फ काशिनाथ डावरे यांचा 'शेतशिवार' हा कवितासंग्रह कृषी संस्कृतीचा आणि अभिजात मराठी भाषेचा उत्कट उद्घोष असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. अकोले तालुक्यातील निंब्रळ पो. संभोडी येथील 'आंतरभारती' साप्ताहिकाचे प्रा. आनंदा डावरे यांच्या 'शेतशिवार' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा एडीसी बँकेच्या स्व भाऊसाहेब पा. हांडे सभागृहात आयोजित करण्यात

आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबई येथील साहित्यिक राजेश साबळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये गझलकार डॉ. शिवाजी काळे, ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी कुमावत, संभोडीचे सरपंच, साखर

कारखाना संचालक पाटीलबा सावंत, नागेश हुलवळे, अनिल मंडलिक, दिलीप उगले आदिंनी मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंदा डावरे यांनी स्वागत प्रास्तविक केले. विलासराव मालुंजकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुस्तक प्रकाशन हे साहित्यिकांच्या हातून झाले पाहिजेः-


डॉ. शिवाजी काळे पुस्तक हा ज्ञानाचा, संस्काराचा, संस्कृतीचा विषय आहे, आजचे सोहळे हे देखाव्याचे, मानापानाचे नि प्रसिद्धीचे दालन झाले आहे, ज्यांना लेखक, पुस्तक याविषयी प्रेम आणि अनुभव आहे, त्यांच्याच हातून पुस्तक प्रकाशन

करावे, व्यक्ती यांना साहित्यिक, सूज्ञ वाचक यांना बोलवावे, राजकीय व्यक्तिंना अजिबात बोलावू नये असे आवाहन डॉ. काळे यांनी केले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'शेतशिवार' सारखे कवितासंग्रह अभ्यासासाठी घेतले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राजूर येथील ज्येष्ठ अभियंता अनिल देशमुख, प्रमोद देशमुख यांनी मित्रवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार केला. बाळूनाना घाडगे, रघुनाथ गुंजाळ, रामनाथ ढोकरे, मिलिंद भोर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विलासराव मालुंजकर यांनी केले तर संयोजक प्रा. आनंदा डावरे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा