इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये अभियंता दिनाचे औचित्य साधून १५ सप्टेंबर २०२५ रोजी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एजुकेशन च्या स्टुडन्ट चॅप्टर एम एच ३२३ व विद्यार्थी असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने नवागत विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वप्नांना पंख या उपक्रमांतर्गत
स्वागत व दीक्षारंभ कार्यक्रम ऑडिटोरियम मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योग, संशोधन आणि प्रशासन जगातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा विशेष उपस्थिती लाभली. कमिन्स इंडिया लिमिटेड, पुणे येथील उपमहाव्यवस्थापक तोसिफ मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व उद्योगातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. तोसिफ मुल्ला यांनी कमिन्स शिष्यवृत्ती योजनेची माहिती देत अर्ज प्रक्रिया स्पष्ट केली. उद्योगक्षेत्रात संधी अमर्याद आहेत, मात्र त्या साधण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा व आत्मविश्वास या मूल्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कमिन्स शिष्यवृत्ती सारख्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याचे शिल्पकार व्हावे असे आवाहन श्री. मुल्ला यांनी केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट माळेगाव बारामती येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संग्राम चव्हाण यांनी कृषि व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
डॉ. संग्राम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत यशस्वी अभियंता होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची वृत्ती, संघभावना आणि सातत्याने कौशल्य विकास करण्याची गरज यावर विशेष भर दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी गेल्या वर्षातील स्टुडन्ट चॅप्टरच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ साठी नव्या समितीची घोषणा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्मार्ट ब्रँड बनण्याचे आवाहन करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत यामध्ये योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रथम वर्षातील वर्गप्रतिनिधी व मुलींच्या प्रतिनिधींनाही फुल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात द्वितीय वर्ष विद्यार्थिनी रसिका कोकाटे हिने आपले मनोगत व्यक्त केले. तुकाराम चव्हाण यांनी कमिन्स शिष्यवृत्ती मिळविण्याचा अनुभव सांगितला.
डॉ. प्रितम ठाकूर म्हणाले, दीक्षारंभ कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांना कॉलेज वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होते व त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी योग्य दिशा मिळते.
प्रमुख अतिथींची ओळख तसेच
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख, कार्यक्रम समन्वयक डॉ. संजय कदम, प्रा. बापूसो पवार, प्रा. भारती नलावडे, जमीर शेख आदींनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा