कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- येथे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त सहस्त्रचंडी यागाचे अकरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच अष्टमिला अग्निस्थापना, नवग्रह, पिठदेवता, सप्तशतीपाठ हवनाने आरंभ करून विजयादशमीला पुर्णाआहुतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यानिमित्त दररोज आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सहस्त्रचंडी यागाचे आयोजन लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट, लक्ष्मी नृसिंह अन्नछत्र मंडळ, समस्त पूजाधिकारी मंडळ, लक्ष्मी नरसिंह देवस्थान, समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या व श्रीकांत दंडवते व सहकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम दिन आवश्य प्राणानाम्य पंचगव्य प्रोक्षणम् प्राशण आणि शुद्धी तसेच कुलदेवता व ग्रामदेवता नमस्कार, आर्चायक्रम स्थलशुद्धी यज्ञशाला पुजन, द्वार पुजन, ध्वज पुजन व ध्वजारोहण बलीप्रदान भुमी प्रार्थना, यज्ञशाळा प्रवेश, गणपती पुजन पुण्याहवाचन मातृका पुजन - नांदी आद्ध आचार्य वर्णम् ऋत्तीग वर्णम् सप्तशती पाठ आरंभ, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशतीपाठ, सायंकाळी वेदपठण, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशतीपाठ, सायंकाळी वेदपठण, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशती पाठ, सायंकाळी : वेदपठण, कुंकुम अर्चन, सकाळी स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशती पाठ, सायंकाळी वेदपठण, हिरण्य अर्चन, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती-सप्तशती पाठ, सायंकाळी : वेदपठण, पुष अर्चन, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशती पाठ, सायंकाळी वेदपठण, पंच खाद्य अर्चन, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती -सप्तशती पाठ, सायंकाळी : वेदपठण, कमाकुरीका, कन्या पुजन, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती. सप्तशती पाठ, अग्नीसुक्त पठण, अग्नीमंथनातून अग्नी प्रकट, अग्नी स्थापन व पुजन, नवग्रह हवन, पाठाचे हवन, सायंकाळी : वेदपठण, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, आरती, सप्तशती हवन, सायंकाळी : वेदपठण, सकाळी : स्थापीत देवता पुजन, देवतांचे पाठ, सप्तशती हवनानंतर आरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी २१ पुरोहितांमार्फत व सुदर्शन काका जकाते व ओंकार शास्त्री डिंगरे यांच्या मुख्य पौराहित्याखाली होणार आहे. यामध्ये कोईमतूर (तमिळनाडू), परभणी, लातूर, अमरावती, पंढरपूर, इंदापूर येथील वैदिक पुरोहित पाठशाळेत शिक्षण घेतलेले २१ पुरोहित अकरा दिवस सहस्त्रचंडी याग पुर्ण करणार आहेत.
पहिल्या दिवशी देवता व्यासपिठ स्थापन व पुण्याहवाचनासाठी सौ. अनुराधा व प्रदिप गारटकर, सौ. ॲड. योगिता व ॲड. वल्लभ देशपांडे, सौ. प्रांजली व प्रसाद दंडवते दाम्पत्याच्या हस्ते सहस्त्रचंडी यागाचा शुभारंभ करण्यात आला. तर (दि.३०) रोजी अष्टमिला अग्निस्थापना, नवग्रह, पिठदेवता, सप्तशतीपाठ हवनाने आरंभ करून विजयादशमी दिवशी पुर्णा आहुतीने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे श्रीकांत दंडवते यांनी शेवटी सांगितले.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सहस्त्रचंडी यागाचे शुभारंभ करताना.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा