उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
माळीनगर येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल हायस्कूल,माळीनगर शाळेच्या ज्युनि.कॉलेजच्या कला शाखेच्या सन २००८-०९ या वर्गाचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी शालेय परिसरात आयोजित करण्यात आला होता दरम्यान या स्नेह मेळाव्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी माळी शुगरचे व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,प्रशालेचे माजी प्राचार्य अनुपमा कुलकर्णी , प्रकाश चवरे,सध्याचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,सुनील शिंदे,वैशाली पांढरे, संगीत विभागाचे बाळासाहेब सोनवणे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भीमराव चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र गिरमे म्हणाले की,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान आहे त्यांना काही अडचण आल्यास आम्ही पाठीशी उभा राहू येत्या काळात संस्थेच्या सेवानिवृत्त माजी शिक्षकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.तसेच स्नेह मेळाव्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी तीन किलो साखर भेट देण्यात आली.
यावेळी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की,माझ्या जडणघडणी ते माझ्या अधिकारी होण्यामध्ये मॉडेल हायस्कूलचा मोठा पाठिंबा आहे मी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना संस्थेने नेहमी मला माझ्या शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.मी अधिकारी व्हावे आणि पुढे जावे ही संस्थेच्या पदाधिकारी आणि माझे सहकारी शिक्षकांची इच्छा मी पूर्ण करू शकलो.आज विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना शालेय कामकाजामध्ये शिकलेली शिस्त आणि विद्यार्थ्यांना घडवताना केलेले मार्गदर्शन माझ्या कामी येत आहे.मॉडेल हायस्कूल शाळेचा यामुळे मी कायम ऋणी राहणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोपट जमदाडे,नितीन रास्ते,नितीन चव्हाण,मल्हारी इंगळे, धनंजय कपने यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरी इनामदार हिने केले तर सूत्रसंचालन तेजस्विनी सुरवसे हिने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा