यशवंतनगर --प्रतिनिधी नाझिया मुल्ला
टाइम्स 45 न्यूज मराठी
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
यावेळी प्रमुख अतिथी दिलीप खोटे शाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया, सुरज माने रोखापाल बँक ऑफ इंडिया, प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव उपस्थित होते.
हिंदी भाषेला 14 सप्टेंबर 1949 रोजी मिळालेला राजभाषा हा दर्जा व त्यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना अवबोधित व्हावी या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते थोर हिंदी लेखक व उपन्यासकार मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .सर्व अतिथींचा सन्मान समारंभ प्रशालेच्या वतीने पार पडला.
हिंदी दिनानिमित्त अविष्कार फाउंडेशन सोलापूर जिल्हा शाखा आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशील क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेतील क्रीडा शिक्षक अनिल मोहिते यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला. हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सोहम बनकर ,प्रांजल चव्हाण ,दक्षता शेगर ,भूमिका कारमकर, धनश्री लोखंडे या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले.
प्रशालेतील विद्यार्थिनी वृषाली कारमकर व समृद्धी बाबर यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले.
सहशिक्षिका प्राजक्ता पोखरे यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषेच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली.
प्रमुख अतिथी दिलीप खोटे यांनी आपल्या मनोगतातून बँकेच्या व्यवहारांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या
प्रमुख अतिथी सुरज माने यांनी आपल्या मनोगतातून हिंदी दिवस आपल्याला आपल्या भाषेचा गौरव राखून ठेवण्याची प्रेरणा देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले तर आभार श्रावणी शिंदे हिने मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा