संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर : राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाला प्राधान्य देणारा उपक्रम राबवित,तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी यंदाची दिवाळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरी केली.त्यांच्या संकल्पनेतून स्वआधार मतिमंद बालगृह,धाराशिव येथे मतिमंद विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना फटाके,गोडधोड,ब्लॅंकेट्स व विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.दिवाळीचा आनंद या लहानग्यांच्या चेहऱ्यावर दिसताच उपस्थित सर्व मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
"मतिमंद विद्यार्थी हे आमचे कुटुंब आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे आमचे कर्तव्य आहे,"असे भावनिक उद्गार तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी यावेळी काढले.त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत असून,जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी हा एक प्रेरणादायी संदेश ठरला आहे.
यावेळी तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे,विकास जाधव,भुजंग मुकेरकर,स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिक,पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कि —“राजकारणापेक्षा समाजकारण मोठं आहे,आणि अमोल जाधव यांनी ते कृतीतून दाखवून दिलं आहे.अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो.”
अमोल जाधव यांच्या या ‘समाजाभिमुख दिवाळी उपक्रमा’चे संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचे वर्षाव होत असून, इतर पदाधिकाऱ्यांनाही समाजसेवेची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा