सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
स्वच्छतेतून समृद्धी केंद्रबिंदू मानून इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेस प्राधान्य दिले आहे. या अभियानात नागरिकांनी देखील अनमोल योगदान देऊन नगरपरिषदेस पुन्हा देशपातळीवरील यश मिळवून द्यावे असे आवाहन राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी केले.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ उपक्रमाचा समारोप इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी यांनी आपल्या एका दिवसाच्या वेतनाचा १ लाख ४३ हजार ४१२ रुपयांचा धनादेश मंत्री दत्तात्रय भरणे यांना पूरग्रस्त शेतकरी यांच्या मदती साठी देण्यात आला.
दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला होता. या अंतर्गत शहरात स्वच्छता मोहिमा, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी प्रास्ताविक भाषणात या अभियानाचा आढावा सादर केला.
यानिमित्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरोग्य विभाग सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
दिव्यांग महिला रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार झाला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत बचत गटांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे बीज भांडवल प्रदान करण्यात आले.
एकूण १७६ लाभार्थ्यांना ८.६२ लाखांचे अनुदान वितरण करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र सीएसआर फंडातून मिळालेल्या ७ ई-बाईक चे लोकार्पण मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख निकाल :
गणेशोत्सव स्पर्धा प्रथम.
नरसिंह प्रसादिक गणेश मंडळ, कासारपट्टा.
व्दितीय : श्रीमंत शिवराज मंडळ, मंडई
तृतीय : छत्रपती शिवाजी मंडळ, खडकपुरा.
पाककला स्पर्धा :
प्रथम - माधवी कांबळे – डिनर सेट
व्दितीय : सपना वाघमारे – पोळी डबा
तृतीय : कविता खंडाळे – मसाला डबा.
दिव्यांग महिला रांगोळी स्पर्धा :
प्रथम : जयश्री नगरकर.
व्दितीय : शितल परदेशी.
तृतीय : ज्योति शेलार.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, रमेश शिंदे,
यांच्यासह नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा