सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
डॉ. झांबरे कुटुंबात सात जण डॉक्टर असून त्यांनी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा समजून रुग्णांना जीवदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
बारामती सूर्यनगरी येथे डॉ. पृथ्वीराज नंदकुमार झांबरे यांनी नव्याने सुरू केलेल्या होमिओपॅथिक क्लिनिकचा उद्घाटन समारंभ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यात महाआघाडीचे सत्कार असताना पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्या मंत्रिमंडळात मी देखील सहकार व संसदीय कार्य मंत्री होतो. राज्यातील डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन त्यावेळी होमिओपॅथिक
डॉक्टरांना एक वर्षाचा आधुनिक शास्त्राचा फार्माकोलॉजीचा अभ्यासक्रम देण्यासाठी डॉ. बाहुबली शहा व इंदापूरचे डॉ. संदेश शहा त्यांच्या सहकाऱ्यां समवेत माझ्याकडे आले होते. त्यावेळी नागपूर अधिवेशनात शेवटच्या दिवशी रात्री दोन वाजता हे विधेयक मंजूर करून घेतले. त्यासाठी आवश्यक कोरम गोळा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली असल्याची आठवण त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बाहुबली शहा म्हणाले, सर्व चिकित्सा पद्धतीच्या पलिकडे मानवी जीवन आहे. त्यामुळे झांबरे कुटुंबातील डॉक्टरांनी होमिओपॅथी बरोबरच होलिस्टिक पद्धतीने रुग्णसेवा करून बारामतीच्या नावलौकिकात भर घालावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पृथ्वीराज हे प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. नंदकुमार झांबरे यांचे चिरंजीव असून डॉ. नंदकुमार झांबरे यांच्या होमिओपॅथीच्या प्रदीर्घ अनुभवातून अनेक रुग्ण जुनाट आजारातून रोगमुक्त झाले आहेत.
डॉ. पृथ्वीराज यांनी भारती विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मधून बीएचएमएस शिक्षण घेतले असून असून सोलापूर येथे एम. डी केले आहे.या अद्यावत होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये विविध नव्या व जुनाट आजारांवर माफक दरात औषधोपचार केले जाणार असल्याचे डॉ. पृथ्वीराज झांबरे यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. नंदकुमार झांबरे यांनी स्वागत केले.
यावेळी मा. नगराध्यक्ष सदाशिवबापू सातव, डॉ. रमेश भोईटे, डॉ. प्रदीप खलाटे, डॉ. रवि भोसले, डॉ. संदेश शहा,
डाॅ. अमोल जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सौ. प्रतिभा झांबरे व डॉ. श्रीनिवास झांबरे यांनी आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा