Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

अमेरिकेतील FBI चे संचालक-"काश पटेल" यांनी हिंदुंना दीपावलीच्या शुभेच्छाची पोस्ट केल्याने झाले ट्रोल-त्यांना अमेरिकेत करावा लागत आहे द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

FBI Director Kash Patel faces Hate for Diwali post : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या विभागाचे संचालकपद भारतीय वंशाचे नागरिक काश पटेल यांच्याकडे सोपवले होते. भगवद्गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी संचालकपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे ते भारतात कौतुकाचा विषय ठरले होते. काश पटेल यांनी नुकतीच दिवालीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट एक्सवर शेअर केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतून द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना करावा लागत आहे.

एफबीआय ही अमेरिकेतील एक महत्त्वाची संस्था आहे. त्याच्या संचालकपदावरील व्यक्ती हा महत्त्वाचा नेता मानला जातो. मात्र इतक्या उच्च पदावर असतानाही काश पटेल यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दिवाळी निमित्त सोमवारी (२० ऑक्टोबर) पटेल यांनी एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये अतिशय साधारण संदेश होता. "दिवाळीच्या शुभेच्छा! वाईटावर चांगल्याचा विजय, याचे प्रतीक म्हणून जगभरात प्रकाशाचा उत्सव साजरा केला जात आहे", या कॅप्शनसह त्यांनी खाली एक फोटो शेअर केला. ज्यावर शुभ दिवाळी असे लिहिले होते. आक्षेपार्ह किंवा तक्रारीचा सूर काढावा, असे या संदेशात काहीही नव्हते. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशाप्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तरीही अनेक अमेरिकन नागरिकांनी या पोस्टखाली कमेंटमध्ये नाराजी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा