*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
भरत शहा यांच्या नगराध्यक्षपदाच्या विजयासाठी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवास साकडे, युवा कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरत आला परत च्याच जोरदार घोषणा.
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स न्यूज 45 मराठी, सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी आरक्षित असल्याने अनेकजण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विजयासाठी शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी दक्षिण प्रयाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री निरा-नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवास विशेष अभिषेक करून भरत शहा मित्र परिवाराने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात शहरातील अनेक नागरिक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा विक्रमी मतांनी विजयी व्हावेत, यासाठी लक्ष्मी नरसिंह देवास यावेळी साकडे घालण्यात आले.
भरत शहा यांच्या भावजय सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात इंदापूर नगर परिषदेने राष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करून इंदापूर नगरपरिषदेचे नाव देश पातळीवर झळकवले.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग पाच वर्षे देशपातळीवर इंदापूर नगरपरिषदेचा नावलौकिक झाला आहे.शहरात नवीन व्यापारी संकुल, अत्याधुनिक नगरपरिषद भवन,शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा,शहर कचरामुक्त करण्या साठीचे उपक्रम, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्णय तसेच अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, ऑक्सिजन पार्क व बायोडायव्हर्सिटी प्रकल्पांतर्गत हजारो वृक्षांची जोपासना अशा विविध कामांमुळे शहा परिवाराचे कार्य सर्वदूर चर्चेत आहे. शहा परिवाराचे इंदापूर शहर व तालुक्याच्या राजकीय,सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शेती, सहकार क्षेत्रात अनमोल योगदान आहे. सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. इंदापूर शहराच्या सर्वांगिक विकासाचे त्यांचे व्हिजन असून आगामी निवडणुकीत भरत शहा यांच्या नगराध्यक्ष पदाला शहरात व्यापक पसंती आहे.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगरसेवक गणेश महाजन, युवा नेते अंगद शहा, प्रमोद राऊत, सुनील तळेकर,प्रशांत उंबरे, निवास माने, बापूराव जामदार, अजिंक्य जावीर,शुभम पवार, गौरव राऊत, प्रवीण हरणावळ,
सोनू सय्यद, महेश पाटील, बापू अडसूळ, गोरख ढावरे, उमेश ढावरे, अभिजीत अवघडे, मनोज राजगुरू, जयवंत बानकर, बंडा चव्हाण आदित्य बोराटे, शकील सय्यद, संतोष जाधव, अजिंक्य ढाणे, अर्शद सय्यद, ओंकार मोरे, अख्तर मोमीन,अक्षय सूर्यवंशी, अमोल माने यांच्यासह शेकडो युवक यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ : इंदापूर : श्री क्षेत्र निरानरसिंहपूर येथे लक्ष्मी नरसिंह देवाला भरत शहा यांच्या विजयासाठी साकडे घालताना भरत शहा मित्र परिवार.
जाहिरात





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा