*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
सणसर लासुर्णे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून बेलवाडी ( ता. इंदापूर ) येथील ॲडव्होकेट पूजा लक्ष्मण भिसे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हा मतदार संघ महिला एससी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. ॲडव्होकेट पूजा या अभ्यासू, हुशार, होतकरू, उच्चशिक्षित आणि कष्टाळू असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. पूजा भिसे या उच्चशिक्षित, नामांकित, पदवीधर वकील असून त्यांचे वडील लक्ष्मण भिसे हे सामाजिक कार्यकर्ते आणि संपादक,पत्रकार म्हणून प्रसिद्ध असून त्यांचा या मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे गेली तीस वर्षांपासून ते खंदे समर्थक म्हणून सर्वत्र ओळखले जातात.
सणसर लासुर्णे हा मतदार संघ राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातील नागरिक सुज्ञ असून हा मतदार संघ इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार तथा राज्याचे लोकप्रिय कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना मानणारा आहे. या मतदारसंघात भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा समावेश असून हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या ताब्यात असून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, मा. संचालक भाऊसाहेब सपकळ यांची ही कर्मभूमी आहे. उपरोक्त सर्व मान्यवरांशी श्री. भिसे यांचे चांगले संबंध आहेत. श्री. भिसे यांनी पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबद्दल प्रत्येक गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी मतदार, यांच्या बरोबर चर्चा आणि गाव भेटी दौरे सुरु केले आहेत. त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारी बद्दल सणसर लासुर्णे जिल्हा परिषद गटातील सर्व मात्तब्बर नेते मंडळी, महिला वर्ग तसेच तरुण कार्यकर्ते, नागरिक सकारात्मक असून पूजा भिसे यांनी चांगला निर्णय घेतल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पूजा भिसे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून लवकरच शिष्टमंडळ राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांना भेटणार आहे.
यासंदर्भात पूजा भिसे यांच्याशी संपर्क साधला असता युवती व महिला सक्षमीकरण, युवकांना काम, शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे. पक्षाने मला तिकीट दिल्यास राज्यातील आदर्श जिल्हा परिषद मतदार संघ करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा