Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आंदोलनाच्या इशारा नंतर अकलूज मध्ये CNG पुरवठा सुरळीत

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 

गेल्या काही दिवसांपासून अकलूज शहरामध्ये सीएनजीचा पुरवठा अत्यंत अपुरा असल्याने नागरिक, वाहनचालक व प्रवासी वर्ग त्रस्त झाला होता. वाहनचालकांना दिवसातून तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते अखेर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून अकलूजमधील सीएनजी पुरवठा आता पूर्ववत आणि सुरळीत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिक आणि वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात येत असून, योग्य प्रश्नासाठी ठामपणे आवाज उठवल्याबद्दल सोमनाथ अरुण भोसले यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत.अकलूज शहर हे माळशिरस तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून "मेडिकल हब" म्हणूनही ओळखले जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एकमेव सीएनजी पंप असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे या पंपावर प्रचंड गर्दी होत होती.साधारणतः दिवसाला आठ ते दहा सीएनजी गाड्यांची आवश्यकता असताना, मागील महिन्याभरात पंढरपूर सीएनजी स्टेशनमधून फक्त एका गाडीचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता.या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी थेट केंद्र व राज्य शासन पातळीवर व्यापक पाठपुरावा केला. त्यांनी भारताचे पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे संयुक्त सचिव, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी सोलापूर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे तसेच एचपीसीएल सोलापूर या सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले.           

                       या निवेदनात अकलूजसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा मागणीनुसार वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर आणि अक्कलकोट ही धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे असल्याने येथे ऑनलाईन सीएनजी पंप सुरू करून नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा,अशी मागणी सोमनाथ भोसले यांनी केली होती.या निवेदनाची दखल संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंपांवरील पुरवठा वाढविण्यात आला असून, विशेषतः अकलूज सीएनजी पंपावर दिवसातून चार ते पाच सीएनजी गाड्या नियमित येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सीएनजी तुटवड्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. या सर्व कार्यवाहीमुळे अकलूज आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून,“जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे आणि तो निकालात काढणारे नेतृत्व म्हणजे सोमनाथ अरुण भोसले” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा