*उपसंपादक ---नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी सहकार क्षेत्रातील विशेषतः सहकार क्षेत्रातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध समस्या व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.दुग्ध उत्पादक शेतकरी, सहकारी दूध संघ आणि सहकार क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांबाबत खासदार मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली.यावेळेस मंत्री अमित शहा यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच बनास (गुजरात) येथील सहकार मंत्रालयाच्या अभ्यास दौऱ्यासाठी आवश्यक संधी व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सहकार मंत्री अमित शहा यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा