Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

तुम्ही भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा विजयी करा शहरास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही--- उपमुख्यमंत्री अजित पवार..

 सहसंपादक --डॉ .संदेश शहा 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9922419159



इंदापूर शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहा परिवाराने अनमोल योगदान दिले आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी कै. नारायणदास शहा उर्फ बप्पा, त्यानंतर शिक्षण, सहकार व स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी कै. गोकुळशेठ शहा व सुरेशदास शहा यांनी योगदान दिले. त्यानंतर माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांनी स्वच्छता अभियानात इंदापूरचे नाव देश पातळीवर झळकवले असून शहा परिवाराची विकासाची नाळ घट्ट आहे. शहा परिवारातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांचे शहर विकासाचे मोठे व्हिजन आहे. त्यामुळे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा व पॅनेलला बहुमताने विजयी करा, शहर विकासास निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची सांगता प्रचार सभा शहरातील बाबा चौकात संपन्न झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, शहा परिवाराने सहकार, शिक्षण, शेती, आरोग्य, राजकीय तसेच इतर सर्व क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे. विकासाच्या बाबतीत ते आग्रही आहेत. व्यापारी संघाच्या वतीने त्यांनी इंदापूर व करमाळा तालुक्यास जोडण्या साठी भीमा नदीवर पूल करा असे भरत शहा यांनी पत्र दिले असता त्यासाठी तात्काळ सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचे काम प्रगती पथावर आहे. यामुळे शहराचा व्यापार तसेच दळणवळण वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वच्या सर्व म्हणजे २१ उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नेहमी प्रमाणे तोंडसुख घेऊन टीका करताना व सल्ला देताना श्री. पवार पुढे म्हणाले, त्यांनी १९ वर्ष मंत्रिमंडळात काम केले मात्र त्यांनी विकास केला नाही. याउलट मंत्री भरणे यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या मंत्री पदाच्या काळात प्रशासकीय भवन, इंदापूर नगरपरिषद, न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सुसज्ज इमारती बांधून इंदापूर शहराच्या वैभवात भर घालत आहेत. आदरणीय शंकररावजी पाटील यांनी कर्मयोगी कारखाना उभा केला मात्र त्यांनी तो दुसऱ्यास चालविण्यासाठी दिला. हे यांचे कर्तृत्व आहे. नुसता नट्टापट्टा करून चालत नाही तर विकास करण्याची धमक असावी लागते. ती धमक मंत्री दत्तात्रय भरणे तसेच भरत शहा यांच्यामध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकी साठी गेली ३० ते ४० वर्ष एकमेकाचे विरोधक असणारे, एकमेकांचे तोंड देखील न पाहणारे हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर व प्रवीण माने हे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे कृष्णा भीमा विकास आघाडी ही संधीसाधू लोकांची भकास आघाडी असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर शहरासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून भीमा नदीवरील पुलासह ८६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन काहींची कामे पूर्ण झाली आहेत तर काहींची सुरू आहेत. वीरश्री मालोजीराजे गढी व हजरत चांदशाहवली बाबा दरगाह, प्रशासकीय इमारती, नगरपरिषद इमारत, चौक सुशोभीकरण, क्रीडा संकुल संवर्धन, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका यासाठी निधी मंजूर आहे. शहरातील नागरिकांच्या शास्तीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून   सरकार पुढे असून शास्ती माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भरत शहा हे शांत, संयमी, विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल २१ विरुद्ध शून्य मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.



यावेळी भरत शहा म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल. पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर शहराचा बारामती प्रमाणे आदर्श घेऊन विकास करण्याचे व्हिजन आहे. आम्ही गेली तीन पिढ्या तुमच्याबरोबर काम करत असून गेली १९ वर्ष तुमच्यासोबत काम करत होतो. तुम्ही दिलेल्या पदांचा वापर करून तुमच्या संस्था फायद्यात आणल्या. नंतर आम्ही संस्थेतून बाहेर पडलो. शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत गेलो, मग तुमच्या पोटात का दुखते या शब्दात भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. उजनीची पाणीपुरवठा योजना कुणाच्या काळात झाली, कॅन्सर ला कुणी आमंत्रण दिले, तरंगवाडी तलावातून कोण पाणी उचलते याचा अभ्यास टीकाकारांनी करावा.  इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर, हरित व भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.



यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, b. सूत्रसंचलन प्रशांत सिताप यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा