Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

*वारकरी आजरेकर फडाच्या वतीने फडाचे प्रमुख श्रीगुरु हरीभाऊ बोराटे यांच्या हस्ते नगराध्यक्ष भरत शहा यांचा सत्कार.*

 *सहसंपादक -डॉ,संदेश शहा,*           

         *इंदापूर*

    *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:9922419159*



इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी वारकरी संप्रदायाचे भरत शहा निवडून आल्याबद्दल त्यांचा वारकरी संप्रदायातील श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फडाच्या वतीने फड प्रमुख श्रीगुरु हरीभाऊ बोराटे महाराज यांच्या हस्ते इंदापूर येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी आजरेकर फड प्रमुख श्रीगुरु हरिभाऊ बोराटे महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये अध्यात्मात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्ती सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. वारकरी संप्रदायाचा आदर्श घेऊन काम करणारे भरत शहा यांच्या पारदर्शी, सर्वसमावेशक कार्यास इंदापूर शहरात   महत्व आहे. देहू आळंदी ते पंढरपूर या आध्यात्मिक राज मार्गात इंदापूर शहरास मोठे महत्त्व आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर मुक्कामी असतो. भरत शहा हे आजारेकर फडाचे अनुयायी असून फडाच्या इंदापूर येथील कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे त्यांचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सत्कार करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद भरत शहा यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

                          जाहिरात 👇



सत्कारमूर्ती भरत शहा म्हणाले, माणसाला आयुष्यात शांतता व समाधान प्राप्त करून देण्याचे काम संत महंत तसेच युगपुरुष करत असतात. त्यामुळे हा माझा घरचा सत्कार असला तरी तो मला आध्यात्मिक बळ देणारा आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करताना वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

सूत्रसंचालन सुनील बोराटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा