*सहसंपादक -डॉ,संदेश शहा,*
*इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:9922419159*
आध्यात्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाचा संवेदनशील दृष्टिकोन म्हणजे इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील श्री दत्त देवस्थान हे पंचक्रोशीस आध्यात्मिक पर्वणी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिकाताई यांनी केले. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिकाताई भरणे यांनी शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी शहाजीनगर येथील श्री दत्त देवस्थानला सदिच्छा भेट देऊन श्री गुरुदेव दत्त मूर्तीचे दर्शन घेतले.
यावेळी श्री गुरुदेव दत्तभक्त परिवाराच्या वतीने दत्त देवस्थानचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष
नीलकंठ मोहिते व तानाजी गायकवाड यांनी सारिकाताई भरणे यांचे पारंपरिक धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. देवदर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून आनंद व्यक्त केला.
जाहिरात 👇
सौ. सारिकाताई भरणे पुढे म्हणाल्या, श्री दत्त देवस्थानमार्फत वर्षभर राबविण्यात येणारे धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक उपक्रम, अखंड अन्नदान सेवा, विविध समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य आहेत. श्री दत्त देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान आहे.दत्त देवस्थानमुळे काटी, शहाजीनगर व पंचक्रोशीत आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले असून, भक्ती आणि श्रद्धेची ही जोडच आपली संस्कृती आणि संस्कार टिकवून ठेवते.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा, संस्कार आणि श्रद्धेचा संदेश पोहोचवणारे देवस्थानचे कार्य निश्चितच आदर्शवत असून,असे उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरतात. देवस्थानमार्फत सुरू असलेल्या
पौर्णिमा कालावधीत अखंड अन्नदान सेवेचे त्यांनी विशेष शब्दांत कौतुक केले.भुकेल्याला अन्न देणे हीच खरी मानवसेवा व ईश्वर सेवा असून अशा सेवेमुळे समाजात माणुसकी, समता आणि सहभावना अधिक बळकट होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अध्यात्मिक मूल्यांतून सक्षम नेतृत्व
राजकीय क्षेत्रातील जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालताना आध्यात्मिक मूल्ये हीच सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ताकद असल्याचे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा