Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

*अकलूज येथे लागलेल्या आगीमध्ये गॅरेज आणि भंगार च्या दुकानचे वीस लाखाचे नुकसान.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूजमध्ये एकीकडे निवडणुकाच्या मत मोजणीचा जल्लोष सुरू असताना.दुसरीकडे माळेवाडी-माळीनगर रोड (बाह्यवळण) येथील भंगारचे दुकान व चार चाकी गाडीचे बाॅडीचे व रंगकाम करणा-या मिस्त्रीचे दुकान आगीत जळून खाक झाले.या आगीमुळे दोन व्यवसायिकांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.



               आज अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीची मत मोजणी सुरू होती.त्यात रविवारचा दिवस असल्यामुळे ही दोन्ही दुकान बंद होती.पण फाटकाच्या अताषबाजीतील एक पेटलेला फटाका भंगारच्या दुकान येवून पडल्यामुळे विजय महादेव आडगळे यांच्या भंगाराच्या दुकानाला आग लागली.बघता बघता या आगीने ऐवढे रौद्ररूप धारण केले की बघता बघता भंगारचे दुकान आगीत जळून खाक झाले आहे.त्यामुळे आडगळे यांच्या दुकानाचे पाच ते सहा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.           



                                 .या आगीचा लोट खूप मोठा होता. त्यामुळे शेजारी असलेल्या इम्तियाज बाबासो शेख यांच्या चार चाकी गाडीच्या बाॅडीचे साहित्य व गाडी रंगकाम करण्याच्या मशिनीचे व दुकानचे एकूण १५ लाख रूपयाचे साहित्य जळून राख झाले आहे. अचानक आलेल्या संकटामुळे दोन्ही व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.





      हि आग विझविण्यासाठी अकलूज नगरपरिषदेच्या अग्नीशमन दल व सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमन विभागाच्या कर्मचा-यांनी लवकर आगीवर नियंत्रण आल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.पण दोन व्यवसायिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा