Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

*करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार .नारायण(आबा)पाटील यांच्या प्रयत्नांना यश...करमाळा उपजिल्हा रुग्णालयास २ कोटी निधी मंजूर...*

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*आलिमभाई.   शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



*नागपूर येथे आज दि.८ डिसेंबर २५ पासून हिवाळी अधिवेशन चालू झाले असून आज पहिल्याच दिवशी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीसाठी बांधकामासाठी २०२५-२६ या वर्षाकरीता २ कोटींची तरतूद आज करण्यात आली.बऱ्याच दिवसांपासून इमारतीचे बांधकाम निधी अभावी बंद पडले होते.आमदार नारायण पाटील यांनी वेळोवेळी निधीची मागणी शासन दरबारी केली होती.मतदारसंघात आरोग्याच्या सुख-सुविधा वाढण्यासाठी नेहमीच आमदार नारायण पाटील यांनी प्रयत्न केले.      

                       अगदी २०१४ पासून करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे १०० खाटांचे  रुग्णालय उभे रहावे म्हणून सतत पाठपुरावा चालू होता व त्या पाठपुराव्यास आमदार नारायण पाटील यांना यश ही आल्याने २०१४-२०१९ मध्ये कोट्यावधी निधी मंजूर करण्यात आला होता.नंतरच्या कार्यकाळात मात्र निधी आभावी या इमारतीचे काम बंद पडले होते.त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधानपासून वंचित रहावे लागले परंतु मतदारसंघातील नागरिकांच्या आडी-अडचणी सोडवण्यात नेहमीच अग्रेसर असलेले आमदार नारायण पाटील यांनी आरोग्याच्या सुविधा मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले असून मतदारसंघातील जनता समाधानी दिसून येत आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा