आंबिद बागवान ---सोलापूर
सोलापूर : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांचा सर्वाधिक ओढा पाहायला मिळतो सोलापुरात तब्बल 1000 हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले होते त्यापैकी 800 चाळीस जणांनी पक्षाच्या कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.
या इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सुरू आहे. दिवसाला दहा प्रभाग अशा पद्धतीने मुलाखती घेतल्या जात आहेत.
मंगळवारी सकाळच्या सत्रात एक ते पाच आणि दुपारच्या सत्रात सहा ते दहा अशा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
त्यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी कार्यालयासमोर दिसून आली शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्ष रंजीता चाकोते, मोहन डांगरे, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, भाजयुमो शहराध्यक्ष विजय कुलते, मंडल अध्यक्ष अक्षय अंजीखाने हे इचुकांच्या मुलाखती घेत आहेत.
काही दिवसापूर्वीच सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता ते सुद्धा प्रभाग चार मधून इच्छुकाची मुलाखत देण्यासाठी प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आल्याचे दिसून आले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते.
मुलाखती वेळी त्यांना तुम्ही पूर्वी काँग्रेसचे होता आता भाजपमध्ये का? असा प्रश्न करण्यात आला. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा पक्ष आणि भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे हिंदुत्ववादासाठी तुम्ही काय उपक्रम राबवले असे अनेक प्रश्न बंदपट्टे यांना करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका सुधा अळीमोरे, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही मुलाखती दिल्याचे पाहायला मिळाले.
एक ते दहा प्रभाग हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात असल्याने आमदार विजयकुमार देशमुख समर्थक माजी सभागृह नेते शिवानंद पाटील हे भाजप कार्यालयात ठाण मांडून दिसून आले त्यांचा सर्वत्र वाच असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा