Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

निमगांव केतकी येथे कृषी‌ दुतांकडून‌‌ शेतकऱ्यांना बँक कर्जाचे मार्गदर्शन*

 *अकलूज ---प्रतिनिधी*

*एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*




निमगांव केतकी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषी दुतांकडून गावातील शेतकऱ्यांसाठी बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक दस्तऐवजांची माहिती देणे आणि व्यावहारिक मार्गदर्शन करणे हा आहे. कृषी दुतांनी शेतकऱ्यांसमोर उदाहरणाद्वारे दाखवले की, बँक कर्जासाठी अर्ज कसा तयार करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि कर्ज मंजुरीसाठी कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो. प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची माहिती, जमीन व शेतीशी संबंधित आकडेवारी सादर करून कृषी दूतांशी संवाद साधला.‌शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास ते बँकेकडून कर्ज मिळवणे अधिक सुलभ होते. यावेळी‌ कृषीदुत स्वप्निल नाईकनवरे, प्रज्योत शिरढोणे, रोहित मगर, विवेक घुले, शेखर टापरे, श्रीराम फडतरे, प्रथमेश दुरगुडे, शिवराज निंबाळकर, गुरुदत्त भोसले यांनी या उपक्रमातून व्यावहारिक अनुभव मिळवला आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक साधनांची माहिती सुलभ पद्धतीने देण्याचे महत्व समजले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर तसेच विषयतज्ज्ञ प्रा. एस. वी. तरंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा