*मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व इतर सर्व नावाजलेल्या कंपन्यांना कर वसुलीची नोटीस बजावली असूनही मागील अडीच वर्षांपासून वसुली करण्याकरिता चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक २२ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रशासनाने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ प्रमाणे वसुली कारवाई करण्यात आली नाही तर आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी (माजी सैनिक) यांनी पंचायत समिती तुळजापूर येथे आक्रोश व्यक्त करण्याकरिता घंटानाद आंदोलन करण्यात येईल असे एका लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना देण्यात आले आहे
त्यामुळे तामलवाडी येथील पंचक्रशीत औद्योगिक वसाहतीमधील कर वसुली संदर्भात व वेळकाढूपना अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात खूप चर्चा होत आहे तसेच माजी सैनिक सावंत यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांना एक कुशल प्रशासक म्हणून जाब विचारला की, "साहेब अडीच वर्षे होत आहे या प्रकरणास प्रत्यकवेळी आंदोलन केल्याशिवाय आपण काम पुढे सरकवले नाही आजपर्यंत जवळपास या कर वसुलीच्या कामाकरीता सात वेळा यापूर्वी आंदोलने करावी लागली, ही भांडवली मूल्यावर आधारित कर वसुलीचे आपले कर्तव्य असतानाही आपण हे काम पूर्ण करणार नाही असे तर ठरवले नाही ना की विरोधी पक्षांच्या ग्रामपंचायत मधील काहीही कामे करू नका असा सत्ताधाऱ्यांकडून दबाव तर नाही ना? असा सरळ सवाल त्यांनी गटविकास अधिकारी तुळजापूर यांना केला आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा