Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

मुक्त विद्यापीठ ‘अनुवाद कार्यशाळेतव्याख्यान, चर्चासत्र, कृती सत्रातून साहित्य मंथन*

 *सहसंपादक -डॉ,संदेश शहा,*           

    *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:9922419159*


भाषा अनुवाद केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारा आयोजित तीन दिवसीय विशेष अनुवाद कार्यशाळेत व्याख्यान, चर्चासत्र व कृतीसत्रांनी साहित्यमंथन संपन्न झाले. विद्यापीठाचे भाषा अनुवाद केंद्र आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी – नॅशनल बुक ट्रस्ट), नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा विद्यापीठ मुख्यालयात शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर ते रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.




यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, 

कुठल्याही भाषेचे संवर्धन, विकास, प्रचार व प्रसार करण्यामध्ये अनुवाद आणि पर्यायाने अनुवादकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनुवाद करणे जरी सहज व सोपे वाटत असले, तरी मानवी भाव–भावना, संवेदना तसेच विषयाचा विस्तार व खोली यातील नैसर्गिक आणि कार्यकारण भावात्मक संबंध जोडणे व ते प्रभावीपणे समजावून सांगणे हे कार्य केवळ एक उत्तम अनुवादकच करू शकतो.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात स्वतंत्रपणे भाषा अनुवाद केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याने अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी ही कार्यशाळा एक सकारात्मक पाऊल ठरेल तसेच अनुवादकांची मजबूत साखळी उभारण्याचे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी यानिमित्त व्यक्त केला.

शनिवारी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीतील सभागृहात प्रसिद्ध भाषा अभ्यासक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांनी ‘समाजभाषा आणि अनुवाद’ या विषयावर खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. दोन संस्कृतींमधील सामाजिक संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून अनुवादाकडे पाहिले गेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. परंपरा, म्हणी, वाक्प्रचार, सामाजिक संदर्भ यांनुसार शब्दांचा अर्थ बदलत असतो. त्यामुळे शब्दशः भाषांतर अयोग्य ठरते. यासाठी दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास आवश्यक असून सामाजिक अभ्यासक उत्तम अनुवादक ठरू शकतो. 




मंगळसूत्र, पदर, पुरणपोळी, ई-मेल, क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन यांसारख्या अनेक शब्दांना थेट पर्यायी शब्द उपलब्ध नसतात. अशा वेळी मूळ शब्द ठेवून संदर्भ किंवा तळटीप देणे अधिक योग्य ठरते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यानंतर ‘अनुवादकाचे अनुभव व समस्या’ या विषयावर सुप्रसिद्ध अनुवादक व पत्रकार श्रीमती अपर्णा वेलणकर, ॲड.अभय सदावर्ते आणि प्रफुल्ल शिलेदार यांनी आपले अनुभव कथन केले.

                           जाहिरात 👇



श्रीमती अपर्णा वेलणकर यांनी ‘सिलेक्टेड मेमरी’, ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ आणि ‘शांताराम’ या स्वतः अनुवादित पुस्तकांच्या अनुवाद प्रक्रियेतील बारकावे व अनुभव सांगितले. अनुवादातून वाचकाला आनंद मिळाला पाहिजे. अनुवाद ही अनुभव समृद्ध करणारी प्रक्रिया असून भाषेशी सतत प्रयोग करत ती अधिक घट्ट जोडणारी आहे. अनुवाद म्हणजे गुलामी न करता मूळ लेखका सोबत चालत लेखना तील नवा मार्ग शोधणे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ॲड. अभय सदावर्ते यांनी अनुवाद हे शास्त्र व कला दोन्ही असून भाषेचा प्रवाह टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रफुल्ल शिलेदार यांनी प्रामुख्याने काव्य अनुवाद या विषयावर मार्गदर्शन केले. कवितेचा अनुवाद म्हणजे शस्त्रक्रियेप्रमाणे केलेले हृद्य स्थानांतर असून त्यात आशय व सौंदर्य अबाधित ठेवणे जिकीरीचे असते, असे त्यांनी नमूद केले. कवितेचा अनुवाद करताना काव्यप्रकार, इतिहास व भाषिक परंपरेचे भान असणे आवश्यक असून, भाषेची अस्मिता जपत दुसऱ्या भाषेचे खच्चीकरण टाळावे, असा उपदेशही त्यांनी दिला.

कार्यशाळेत वक्त्यांचा परीचय डॉ. मंगला वरखेडे, रुपाली गायकवाड, डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन भाषा अनुवाद केंद्र व ज्ञान स्रोत केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश बर्वे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा