*करमाळा--- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी ता. करमाळा शाळेचे उत्तुंग यश...
जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूरच्या वतीने आयोजित माढा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी तालुका करमाळा शाळेची विद्यार्थिनी किंजल मिलिंद कांबळे हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री कदम साहेब, विस्तार अधिकारी मा. टकले साहेब ,जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गटकळ साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमाने सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पवार हिवरवाडीच्या सरपंच सौ वैशाली इरकर यांनी किंजल चे तोंड भरून कौतुक केले आहे.
जाहिरात 👇
तिच्या या यशामध्ये वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गायकवाड मॅडम श्री नितीन व्हटकर सर, श्री नाना वारे सर व सौ. पाटूळे मॅडम या सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या ठिकाणी जि प सोलापूर मुख्यालयाच्या विस्ताराधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅडम तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री विकास यादव साहेब विस्तार अधिकारी श्री अजावडेरे सर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून तिला विजयी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा