Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

*निमगाव केतकी येथे जैन सांस्कृतिक भवन इमारतीचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व ललित गांधी यांच्या हस्ते थाटात भूमिपूजन; मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडून दीड कोटींचा निधी जाहीर, पैकी ७५ लाखांचा निधी प्राप्त.*

 *सहसंपादक -डॉ,संदेश शहा,*           

         *इंदापूर*

    *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:9922419159*



जैन समाज हा सचोटीचा व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध असून या समाजाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत अनमोल योगदान आहे. मी ज्या ज्या वेळी आमदारकीची निवडणूक लढवली, त्या त्यावेळी या समाजाने मला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या समाजाच्या मागणी प्रमाणे जैन सांस्कृतिक भवन साठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून पैकी ७५ लाख रुपयांचा निधी मंदिर ट्रस्ट कडे देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 



इंदापूर तालुक्यातील

निमगाव केतकी येथील श्री चंद्रप्रभू महाराज दिगंबर जैन देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जैन सांस्कृतिक भवन चा भूमिपूजन सोहळा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला. निमगाव केतकी गावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या भव्य इमारतीसाठी यापूर्वी दिलेल्या ७५ लाख रुपयांच्या निधीत आणखी ७५ लाखांची भर टाकून एकूण दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री श्री.भरणे यांनी केली. यावेळी इमारतीचे काम पाहणारे सिव्हिल इंजिनिअर अफाक शेख यांचा मंत्री भरणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.



 मंत्री भरणे पुढे म्हणाले, सन २००९ मध्ये जेव्हा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा जैन बांधवांनी मोलाची साथ दिली. तेंव्हा पासून या समाजाचे ऋण फेडण्याची इच्छा मनात होती. समाजहिताच्या कामात आपला देखील खारीचा वाटा असावा या भावनेतून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही निमगाव केतकीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. गेल्या पाच वर्षांत निमगाव केतकी साठी सुमारे १४० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. यामध्ये अल्पसंख्याक समाजा साठीच्या कब्रस्तान साठी ५० लाख, भोसले वस्ती येथील मॉडेल स्कूल साठी १ कोटी ४५ लाख, जनावरांच्या दवाखान्या साठी ८० लाख तसेच इतर नागरी सुविधांसाठी ७५ लाख रुपयांचा समावेश आहे. १९९२ पासून जनसेवे च्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले,  जैन समाज देशव्यापी कार्यात मोठे योगदान देत आहे. देशातील एकूण सेवाभावी संस्थांपैकी ६३ टक्के संस्था या जैन समाजाच्या असून देशाच्या अर्थकारणात जैन समाजाचे सुमारे ३० टक्के योगदान आहे. कोणतीही राष्ट्रीय आपत्ती आली तर मदत करण्यासाठी जैन समाज नेहमी अग्रेसर असतो. त्यामुळे समाजाचा देशहिता मध्ये मोठा सहभाग असून सन २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जैन समाजातील ७०० कोटी रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या अल्पसंख्याक मंत्री पदाच्या काळात सर्व अल्पसंख्याक समाजांना समान न्याय दिला असून मंत्री दत्तात्रय भरणे हे कर्तबगार मंत्री असल्याचे श्री गांधी यांनी आवर्जून स्पष्ट केले.

                            *****जाहिरात*****👇



यावेळी दशरथ डोंगरे, देवराज जाधव, अंकुश जाधव, मच्छिंद्र चांदणे, युवा सरपंच प्रवीण डोंगरे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी, दिगंबर जैन हुमड फेडरेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, सचिन चांदणे, संतोषकुमार व्होरा, अभयकुमार गांधी, भारत गांधी, गोरख आदलिंग, डॉ. सुनील गांधी, अतुल मिसाळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव वैभव दोशी यांनी तर सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा