Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर यांचा गणेश हंगाम २०२५/२६ चा पहिला हप्ता २९०० शेतकऱ्यांना अदा..

 संपादक-- टाइम्स 45 न्यूज मराठी

  मो :-9730 867 448



श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर ता. माळशिरस जि.सोलापूर यांनी ऊस दर जाहीर करणेबाबत. प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग यांनी पत्राद्वारे कळविण्यात आले होते त्या अनुषंगाने साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक होऊन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिनांक  २ डिसेंबर २०२५  रोजी पहिला हप्ता २९०० अदा करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळवले आहे 

याबाबत सविस्तर वृत्त असे

आपले पत्र जा.क्र. प्राससंसो/ ऊसदर जाहीर/१४१०/२०२५ दि.११/११/२०२५

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविणेत येते की, आमचे श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर या कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस उत्पादक शेतक-यांच्या विनंतीनुसार ऊस दर जाहीर करणेबाबतची आढावा बैठक मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे दालनात दि. १४/११/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता आयोजित करणेत आली होती.

त्यास अनुसरुन आपणांस कळविणेत येते की, आमचे कारखान्यचे मा. संचालक मंडळाची शनिवार दि.२०-११-२०२५ ठराव नं.११ नुसार झालेल्या तातडीच्या सभेमध्ये ऊस दराबाबतच्या निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतक-यांना गाळप हंगाम २०२५-२६ करीता आमचे कारखान्याकडुन पहिला हप्ता रक्कम रु.२९००/- प्रति मे. टन असा दर देणेत यावा असे ठरले. त्यास अनुसरुन दि.०१-११-२०२५ ते दि.१५-११-२०२५ अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे पेमेंट दि.०२-१२-२०२५ रोजी ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करण्यात आले आहेत

आपला विश्वास

कार्यकारी संचालक

श्री शंकर स.सा.का. लि. सदाशिवनगर

______________________________'_________________


__________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा