Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

माळीनगर येथे माळीनगर फेस्टिवल व शाळेचे स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ

 उपसंपादक --नुरजहां शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी




माळीनगर येथे विविधरंगी,आकर्षक अशा नाविन्यपूर्ण माळीनगर फेस्टिवल व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात शानदार उद्घाटन करण्यात आले.सासवड माळी शुगर फॅक्टरी,सासवड माळी एज्युकेशन सोसायटी,शुगरकेन सोसायटी, माळीनगर विकास मंडळ,महात्मा फुले पतसंस्था व माळीनगर मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ ते ५ डिसेंबर या काळात माळीनगर फेस्टिवल व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे.यावेळी महात्मा फुले, डॉ.आंबेडकर नगर या नामफलकाचे अनावरण कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके यांचे हस्ते तर दीप प्रज्वलन विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन व फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके,व्हा. चेअरमन निखिल कुदळे,संचालक सतीश गिरमे,राहुल गिरमे,विशाल जाधव,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रकांत जगताप,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक ॲड.सचिन बधे,पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,व्हा.चेअरमन कपिल भोंगळे,संचालक जयवंत चौरे,मनीष रासकर,महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे, अंकुश फुले,संचालक जनक ताम्हाणे,माळीनगर मल्टीस्टेटचे चेअरमन अमोल गिरमे,प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,प्रिन्सिपल वसंत आंबोडकर,मुख्याध्यापक बाळकृष्ण कोळी,सभासद,भागधारक तसेच संस्थेचे शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,रसिक प्रेक्षक,ग्रामस्थ आदी बहुसंख्येने उपस्थित होते.       

             माळीनगर येथील मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर ११० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.त्यामध्ये पुणे,कोल्हापूर,सांगली,सोलापूर जिल्ह्यातून आलेले शाकाहारी, मांसाहारी विविध पदार्थांचे स्टॉल्स,महिलांसाठी खास पुणे,मुंबई येथून आलेले ज्वेलरी,इमिटेशन, कॉस्मेटिक,बेंगल,कपडे, पर्स, पादत्राणे इत्यादी प्रकारचे स्टॉल्स, गृहपयोगी वस्तूंचेही स्टॉल्स उभारण्यात आलेली आहेत. मनोरंजन पार्कमध्ये आकाश पाळणा,ब्रेक डान्स,सेलंबो,कोलंबस, ड्रॅगन ट्रेन,टोरा-टोरा,वॉटर बोट,मिनी ट्रेन यासह यावर्षी वॉटर बलून हे नवीन साधन आलेले आहे.लहान मुलांसाठी जम्पिंग,बाऊंसी,मिकी माऊस हेलिकॉप्टर,चक्री अशी साधने समाविष्ट आहेत.ओपनइयर थिएटरच्या भव्यरंगमंचावर सासवड माळी शिक्षण संस्थेच्या बालविकास मंदिर,प्राथमिक शाळा,इंग्लिश मीडियम, हायस्कूल यातील विद्यार्थ्यांचे १२० विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमातून रोज ३० कार्यक्रम पार पडणार आहेत.  माळीनगर फेस्टिव्हल व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र गिरमे यांचे मार्गदर्शनाखाली माळीनगर विकास मंडळाचे सदस्य व कारखान्याचे सिव्हील,सिक्युरिटी,पाणीपुरवठा व इलेक्ट्रिशियन विभाग तसेच शिक्षण संस्थेचे संचालक आणि विविध समित्या परिश्रम घेत आहेत.तसेच अकलूज पोलीस स्टेशनचे ही सहकार्य लाभत आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा