अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) अकलूज येथे दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.हा स्वागत समारंभ डी. फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वातावरणात समाविष्ट करून घेण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा होता तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीचा एक दुवा होता.या कार्यक्रमाध्ये प्रथम वर्षातील मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले,नृत्य, गायन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.मनोरंजासाठी फन ऍक्टिव्हिटी हि विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या.कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अभिजित रनवरे,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य रामचंद्र गायकवाड,कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी)चे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे व प्राचार्य नानासाहेब देवडकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अभिजित रनवरे मुलांना मोलाचे मार्दर्शन केले व त्यांच्या कलागुणांचे कौतुकही केले. तसेच मुलांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा