संपादक --टाइम्स 45 न्युज मराठी
मो:-9730867448
तुळजापूर येथील अनाधिकृत असलेले जगदाळे पार्किंग च्या पावत्या बंद कराव्यात अशी मागणी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव , मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर , पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे
तुळजापूर येथील जगदाळे पार्किंगला नगर परिषद, तुळजापूर यांच्याकडुन पार्किंग चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना, तसेच त्या जागेचा वाद कोर्टात वाद चालु असताना देखील त्या जागेवर अनाधिकृत पार्किंग चालवुन भाविकांकडुन अनाधिकृतपणे पैसे वसुल केले जातात.
तरी सदरील पार्किंगवर पावत्या फाडणाऱ्या व्यक्तींवर खंडणीचे गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी व भाविक भक्तांना न्याय द्यावा अशी मागणी केली असून
, येत्या आठ (८) दिवसात कार्यवाही करून पार्किंग बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा