Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सराटी येथे कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे रविवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता आयोजन

 *कार्यकारी संपादक* 

*एस.बी.तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-  8378 081 147*


- सराटी (ता. इंदापूर) येथील पालखीतळ मैदानावर अजितदादा पवार विचार मंचच्या वतीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कोकाटे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे रविवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

     याकुस्ती मैदानाचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रदीप गारटकर, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, मधुकर भरणे, हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कुस्ती मैदानामध्ये पै. दादा शेळके (महाराष्ट्र केसरी) विरुद्ध पै. निशांत कुमार (हरियाणा केसरी), पै. समिर शेख (महाराष्ट्र चॅम्पियम, पुणे) विरुद्ध पै. कालिचरण सोलनकर (गंगावेस तालीम कोल्हापूर) आदींसह राज्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत, असे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे यांनी सांगितले.


                         ----:*जाहिरात*:----👇



   या कुस्ती मैदानाचे संयोजक अण्णासाहेब कोकाटे मित्रपरिवार व छत्रपती तालीम सराटी हे आहेत. अण्णासाहेब कोकाटे मित्रपरिवाराच्या वतीने वर्षभर आरोग्य शिबिर, शासकीय योजनांचे दाखले काढणे, गरिबांना धान्य वाटप, देवदर्शन असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती या वेळी अण्णासाहेब कोकाटे यांनी दिली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा