*कार्यकारी संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:- 8378 081 147*
परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे तसेच सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट असेल. वरिष्ठांचा विश्वास पात्र ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या कारभारास शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नरसिंहपूर, गिरवी, टणु लुमेवाडी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, सराटीसह ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या वतीने पोलिस प्रशासनाने स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून सदरचे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाले आहे. पोलीस स्टेशनच्या कामकाज शुभारंभ प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांना पदभार सोपवला.
---:*जाहिरात*:----👇
तसेच सहाय्यक फौजदार प्रकाश माने, सहाय्यक फौजदार भरत जाधव, पोलीस हवालदार जगन्नाथ कळसाईत, किरण चंदनशिवे, महेश गोसावी, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा जगताप, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सलगर, आरीफ सय्यद, शनिदेव कांबळे, समाधान अहिवळे आदी अधिकारी व कर्मचारी यांचीही पोलिस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली.
तसेच नरसिंहपूरच्या वतीने नितीन सरवदे, आण्णा काळे, माजी उपसरपंच नरहरी काळे, जगदीश सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, संतोष मोरे, आनंद काकडे, चंद्रकांत सरवदे, विजय सरवदे, दत्तात्रय कोळी, सचिन कदम, पोलीस पाटील अभयकुमार वांकर, पोलीस पाटील वर्धमान बोडके, पोलीस पाटील मुजावर सय्यद, दिलीप रास्ते, किरण खंडागळे, गौरव देशपांडे आदि ग्रामस्थ व नागरिकांच्या हस्ते सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके व कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्थ अभय वांकर यांनी डॉ सुदर्शन राठोड, प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके, अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व देवस्थानचा महाप्रसाद देऊन सन्मान केला.
चौकट :- नीरा नरसिंहपूर परिसरात कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन अधिक तत्परपणे कार्य करेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी तत्काळ व पारदर्शकपणे सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर राहील. जनतेच्या सहकार्याने शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा मानस असल्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.
फोटो :-नरसिंहपूर येथील पोलीस स्टेशनचा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके पदभार स्विकारत आसताना.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा