*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
माळशिरस तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नोटरी विधीज्ञ ॲड. शब्बीर हजरत जमादार रा. अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर यांचे फर्जंद (सुपुत्र) ॲड, तनवीर शब्बीर जमादार यांचा शुभ विवाह उघडेवाडी (वेळापूर) ता. माळशिरस जि.सोलापूर येथील सजिद खान खुदबुद्दीन कोरबू यांची (दुख्तर) सुकन्या "आयेशा" हिच्याशी दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला हा विवाह सोहळा म्हणजे एक आदर्शवत सोहळा होता
वास्तविक पाहता अलीकडच्या काळात अशा पद्धतीचे विवाह बहुतांश ठिकाणी होताना दिसत आहेत मात्र समाजात आणखी याबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे आजही काही प्रतिष्ठित असलेल्या नागरिकाकडून याचे अनुकरण होताना दिसत नाही याचे अनुकरण करणे हे काळाची गरज असून एडवोकेट शब्बीर जमादार यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून समाजात याची चर्चा होत आहे
तसेच समाजातील अशा विवाहाला दुर्लक्षित करणाऱ्या नागरिकांनी याचे आत्मचिंतन करून अशा पद्धतीचे विवाह करणे आवश्यक आहे जेणेकरून वधू पित्या वर याचा भार पडणार नाही शिवाय विवाहप्रसंगी होणारा अनाठायी खर्च टाळून तोच खर्च वधू-वरांच्या भावी आयुष्यात प्रपंचात अथवा व्यवसायात उपयोगी पडेल याचाही विचार करणे गरजेचे आहे आज समाजात खोट्या प्रतिष्ठेसाठी नागरिक वधू पित्याला विवाहप्रसंगी फालतू खर्च करण्यास भाग पाडतात
आणि नाईलाजास्तव वधू पित्याला केवळ आपल्या मुलीचे हात पिवळे करायचे असते म्हणून वेळप्रसंगी कर्ज काढून मुलीचे हात पिवळे करतो आणि ते कर्ज फेडता फेडता त्याचे आयुष्य निघून जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे या संदर्भात अँड शब्बीर जमादार यांनी मनाशी निश्चय करून विलंब न करता निर्णय घेऊन आपल्या चिरंजीवाचा विवाह साखरपुड्यात करून समाजापुढे अनुकरण करण्यासाठी आदर्श घालून दिला आणि समाजातील प्रत्येकाने आपल्या मुला मुलींचे लग्न साध्या पद्धतीने करावे असे ही आवाहन ॲड-शब्बीर जमादार यांनी केले
या विवाह प्रसंगी बार्शीचे माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफ भाई तांबोळी, ऍड, नितीन खराडे पाटील, ऍड,विशाल पाटील बोरगाव, ॲड, दत्तात्रय आडत वेळापूर, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड,पी टी पिसाळ,
तसेच लुमेवाडी ता. इंदापूर येथील सर्व मुस्लिम जमात, राऊत नगर अकलूज येथील सर्व मुस्लिम जमात याप्रसंगी उपस्थित राहुल नव वधू-वरांना सर्वांनी शुभाशीर्वाद दिले.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा