Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

तुळजापूर येथील दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर झालेल्या मारहाणी बाबत Exploitation अंतर्गत कठोर कार्यवाही करावी- प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*


दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर झालेल्या मारहाणीचा प्रकार हा Exploitation अंतर्गत येत असल्याने IPC व दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 तसेच शासन निर्णय दि. 13/11/2025 अन्वये कठोर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संस्था जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष प्रहार दिव्यांक्रांती संघटना-मयूर काकडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि



मी मयूर काकडे, जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, संघटनेच्या वतीने कळवितो की तुळजापूर येथील दिव्यांग (मूकबधिर) व्यक्ती राजेश श्रीमंत पवार याच्यावर दिनांक 22/12/2025 रोजी झालेली अमानुष मारहाण ही दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचार व Exploitation चा गंभीर प्रकार आहे.



सदर प्रकरणात FIR नोंद असून, आरोपींनी दिव्यांग व्यक्तीच्या असहायतेचा गैरफायदा घेत गंभीर मारहाण व धमक्या दिलेल्या आहेत. हा प्रकार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016, नियम 2017 तसेच महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक दिव्यांग-2025/प्र.क्र.22/कार्यासन-1 दिनांक 13/11/2025 अन्वये थेट लागू होतो.

                          -----: जाहिरात:----




तरी विनंती आहे की, सदर गुन्ह्याची Exploitation म्हणून नोंद घेऊन आरोपींवर IPC व दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करून पीडितास व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा