Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावर दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढण्यास अखेर सुरुवात


 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*


 बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावर दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढण्यास अखेर सुरुवात झाली आहे. त्याबाबत विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

    बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावर दुतर्फा काटेरी कुबाभळी वाढल्याने सतत अपघात होत होते. त्यामुळे रस्त्यालगतची काटेरी झुडपे काढावीत, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व सराटी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कोकाटे यांनी दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन रस्त्यावरील काटेरी कुबाभळी काढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मार्गावरील गणेशवाडी, पिंपरी बु., टणु, नरसिंहपूर आदी गावांतील विद्यार्थी, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.



   तसेच भीमा नदीवरून शेतकऱ्यांनी टाकलेल्या पाइपलाइनमुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच खड्ड्यांमुळे व धोकादायक वळणांमुळे रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे. खड्ड्यांची व धोकादायक वळणांची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणीही अण्णासाहेब कोकाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


    सदर बाबत टाईम्स 45 न्युज मध्येही दोन वेळेस बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावरील काटेरी कुबाभळी व धोकादायक वळणाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.

फोटो - टणू येथे बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावर काटेरी कुबाभळी काढण्याचे काम सुरू असताना.

-------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा