सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
जैन समाजाचे पुणे येथील एच.एन.डी. जैन बोर्डिंग पुन्हा समाजाला मिळवून देण्यासाठी झालेल्या ' एचएनडी वाचवा ' आंदोलनाला मिळालेल्या भव्य व ऐतिहासिक यशानिमित्त शनिवार दि.२९ नोव्हेंबर रोजी पुण्यात अत्यंत मंगलमय वातावरणात
“ सेव्ह एचएनडी कमिटी अभिनंदन सोहळा, पत्रकार सन्मान सोहळा, पिंछी परिवर्तन आणि धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन समारोह” सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जैन बोर्डिंग मैदानावर भव्य दिव्य मंडप आणि व्यासपीठ तयार करून त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी जैन समाजातर्फे आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांना क्रांतिकारी राष्ट्रसंत ही सन्माननीय उपाधी समाजातर्फे प्रदान करण्यात आली.
आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे समाजाला मिळालेला हा विजय ऐतिहासिक ठरला.
त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एकजूट दाखवत जैन विद्यार्थ्यां साठीची ही वास्तू परत मिळविली, याबद्दल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे गुरुदेव आचार्य श्री गुप्तीनंदी महाराज यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे डॉक्टर मेहबूब सय्यद, सकल दिगंबर जैन समाज पुणे कमिटी चे देशभूषण डुड्डू, सुनील मंगुडकर, प्रीतम मेहता, रवींद्र कासलीवाल, स्वप्नील पाटणी, महावीर शहा, मनिष जैन, विरेंद्र शहा, सुजाता शहा, शितल लोहाडे आदी कमिटी मेंबर यांच्या उपस्थितीत गुरुदेव यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सेव्ह एचएनडी आंदोलनात साथ देणाऱ्या सर्व पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पुण्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया मधील पत्रकारांनी आंदोलनाची बाजू निर्भीडपणे मांडली, प्रसार माध्यमा द्वारे ही माहिती प्रशासना पर्यंत पोहोचवून समाजाच्या आवाजाला बळ दिले.
त्या पत्रकारांचा जैन समाजातर्फे सन्मान चिन्ह व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अरविंद जैन, एस.पी. जैन, शोभा धारिवाल, किशोरकाका सराफ, संजोग शहा, शांतीलाल मुथा, विजयकांत कोठारी, ॲड. एस. के जैन, अचल जैन, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब धोका, सीए अशोक पगारिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
सेव्ह एचएनडी चळवळ
आंदोलनाची सुरुवात करून, संघर्षाचा प्रत्येक टप्पा पार करत आणि प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहून विजय मिळवून देणारे अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, ॲड. योगेश पांडे, स्वप्निल बाफना, स्वप्नील गंगवाल, अण्णा पाटील, चंद्रकात पाटील, सुकौशल जिंतूरकर, महावीर चौगुले या कोर कमिटीचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीष जैन, महावीर शहा, वीरेंद्र शहा, सुजाता शहा, मिलिंद फडे, देवेंद्र बाकलीवाल, स्वप्निल पाटणी, शीतल लोहाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समाजातील वरिष्ठांचे मार्गदर्शन,
युवा व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठाने झाला.
जैन समाजाने भविष्यात विद्यार्थीहित, समाजहित व धर्मसंवर्धनाच्या कार्यात अशीच एकजूट ठेवण्याचा संकल्प यावेळी केला.
फोटो ओळ :
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आचार्य श्री गुप्तिनंद जी गुरुदेव यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करताना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे डॉक्टर मेहबूब सय्यद समवेत सकल जैन समाज कमिटी मेंबर.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा