Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

*वारंवार खंडणी उकळणारा 'तो' तिसराही आरोपी जेरबंद* *डॉन असल्याची बतावणी करत उद्योजकाकडून ८५ हजारांची वसुली; आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी_*

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



-कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला 'बारामतीचा डॉन' असल्याचे सांगत वारंवार धमक्या देऊन ८५ हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेला तिसराही आरोपी बारामती तालुका पोलिसांनी अटक केला आहे. न्यायालयाने संबंधित आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

            

                            ----: जाहिरात:----


      फिर्यादी हे बारामती एमआयडीसी परिसरात अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी ऑक्टोबर २०२४ पासून स्वतःला 'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे उकळले. आरोपी फिर्यादीस बारामतीतील विविध हॉटेलमध्ये बोलावून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते.

एप्रिल २०२५ पासून आरोपींनी, 'तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही', अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कधी ४ हजार तर कधी १० हजार रुपयांच्या हप्त्यांत खंडणी वसूल करण्यात आली.ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक परिसरात फिर्यादीस अडवून 'दारूचे बिल भर, नाहीतर हातपाय मोडीन' अशी धमकी देत मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच महिन्यात वंजारवाडी परिसरात आरोपींनी फिर्यादीकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवून धमकीखाली व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. पुढे १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथे १३ हजार रुपयांची मागणी करत पुन्हा मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळली असून, पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

   ही बाब गांभीर्याने घेत बारामती तालुका पोलिसांनी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपी भुषण रणसिंगला एमआयडीसी परिसरातून अटक केली. पुढील तपास सुरू असून न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

     ही कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण; गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक; सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील धनश्री भगत मनोज पवार राजू बन्ने ओंकार भोसले भारतीय खंडागळे रेणुका पवार यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा