Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

*माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रितेश पांढरे तर उपाध्यक्षपदी गोपाळ लावंड यांची निवड.*

 *उपसंपादक - नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*


माळीनगर येथील माळीनगर पत्रकार संघाचे नूतन अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे माळीनगर प्रतिनिधी रितेश पांढरे यांची तर सचिवपदी गोपाळ लावंड एकमताने यांची पुनश्च निवड करण्यात आली. 

             माळीनगर पत्रकार संघाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मिटींगचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे विद्यमान अध्यक्ष गणेश करडे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नूतन अध्यक्ष पदाच्या निवडीत रितेश पांढरे सर यांची पुढील दोन वर्षासाठी निवड करण्यात आली.तसेच विद्यमान सचिव गोपाळ लावंड यांची सर्वानुमते पुनश्च निवड करून काम करण्याची संधी देण्यात आली.नूतन अध्यक्ष रितेश पांढरे हे गेली २० वर्षे पत्रकार क्षेत्रात काम पाहत आहेत. या निवडीवेळी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश करडे,सदस्य प्रदीप बोरावके उपस्थित होते.या निवडीनंतर दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके व संचालक मंडळ,तसेच शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,व्हा.चेअरमन कपिल भोंगळे व संचालक मंडळ,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे व संचालक मंडळ,महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुंरे,संचालक मंडळ,सचिव योगेश कचरे, माळीनगर मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन अमोल गिरमे,संचालक मंडळ व सेक्रेटरी ज्ञानेश्वर व्यवहारे, गहिनीनाथ अर्बन बँकेचे चेअरमन शिरीष फडे,दि मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य कलाप्पाा बिराजदार,तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी श्री.पांढरे व श्री.लावंड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


                          ---: जाहिरात:---👇



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा