सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संविधान निर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, संविधानाच्या मूल्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी लोकशाही, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना संविधानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
संविधानातील तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे मार्गदर्शक ठरते यावर त्यांनी प्रकाश टाकला. संविधानाचे अध्ययन, समज आणि दैनंदिन जीवनातील अंमलबजावणी याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचा संच नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक तत्त्वे देणारे जीवनमूल्यांचे दस्तऐवज आहे. देशाची विविधता, संस्कृती, धर्म, भाषा आणि जीवनपद्धती यांना एकत्र आणण्याची अनोखी क्षमता या संविधानात आहे. त्यामुळे संविधानाचा अभ्यास हा केवळ परीक्षेसाठी नसून जाणीवपूर्वक नागरिकत्वासाठी आवश्यक आहे.
कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक वाचनाद्वारे देशाच्या मूल्यांबद्दल निष्ठा आणि कर्तव्यबुद्धीचे पुनःपुष्टीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी केले. संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा