अकलूज --प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील तांबवे- पायरी पूल (दत्तवाडी) येथील एकमुखी श्रीदत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.हा सोहळा २ डिसेंबर ते ४ डिसेंबर तीन दिवस चालला होता.या सोहळ्यात तीन दिवस दत्त याग व किर्तनाचा कार्यक्रमाने पार पडली हा भव्यदिव्य सोहळा माळशिस तालुक्यातील भाविक व भक्तांसाठी एक पर्वणीच ठरला.
या सोहळ्यासाठी राजकीय मंडळी उपस्थित होती.त्यामध्ये माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख,सामाजिक सेविका तथा शिवशंकर बाझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील,सर्व पक्षाचे पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,विविध संस्थांचे चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यासाठी सुमारे ५ ते ६ हजार भाविक व दत्तभक्त दर्शनासाठी उपस्थित होते.तांबवे पायरी पूल या परिसरात श्रीदत्त प्रभू व स्वामी समर्थ महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे तर भक्तगणांसाठी आनंद धाम मठ उभारण्यात आले आहे.आता अनुसया मातेचे अन्नछत्र उभारण्याचे कार्य सुरू आहे.आतापर्यंत श्रीस्वामी समर्थ महाराज भक्त व दत्त प्रभू भक्त यांच्या सहकार्यावर या परिसरात वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात.
या तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात यज्ञ सोहळा नाशिकचे पुरोहित श्री मयूरपंत कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी दत्तयाग हवन तीन दिवसीय यज्ञ सोहळा पार पाडला तसेच कीर्तनाचे सेवा पहिल्या दिवसाची किर्तन सेवा गणेशानंद महाराज धुमाळ (देशमुखवाडी) यांनी पार पाडले. दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा त्यांची संपन्न झाली.तसेच काल्याचे किर्तन नामदेव महाराजांचे १७ वे वंशज मोरारजी नामदास महाराज यांची पार पडली.सलग तीन दिवस यज्ञ हवन व अन्नदान सेवा चालू होते.तीन दिवसांचे अन्नदान मिळून सात ते आठ हजार लोकांचे अन्नदान सेवा झाली.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सदस्य व सेवेकऱ्यांनी अफाट कष्ट घेतले.
-----------------------------------------------------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा