Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

*करमाळा पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुक न लढण्याचा माजी आमदार जयंतराव जगताप गटाचा निर्णय...?*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *अलिमभाई शेख

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



करमाळा तालुक्यामध्ये सध्या बारा पंचायत समिती गणाकरिता तसेच सहा जिल्हा परिषद गटाकरिता निवडणुका ह्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत भरली असून आज माजी आमदार जयंतराव जगताप गटाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकी मधून माघार घेतली आहे सदरच्या निवडणुका ह्या न लढण्याचा निर्णय माजी आमदार जयंतराव जगताप यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला 

माजी आमदार जगताप पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की सध्या राज्यभरातील राजकीय वातावरण घडूळ झाले असून या अस्थिरतेच्या राजकीय वातावरणामुळेच मी करमाळा तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कसलाही सहभाग दर्शविणारा नसून मी माझ्या कार्यकर्त्यांना विकासात्मक कामे करणाऱ्या उमेदवारालाच आपले मत द्या असा सल्ला दिला असून सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णतः दूषित झाले असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी कोणालाही पाठिंबा देणार नसून यावेळेस मी या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री जगताप यांनी बोलताना शेवटी सांगितले

करमाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये प्रथमताच माजी आमदार जयंतराव जगताप यांनी असा मोठा निर्णय घेतल्याने करमाळा तालुक्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे येऊ पाहणाऱ्या पंचायत समिती तसेचथ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मात्र जगताप गटाचे कार्यकर्ते कोणाला आपले मतदान करणार याबाबत मात्र मोठी उत्सुकता लागली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा