*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
“आधी रोटी, मग शिक्षण!” – कुरेशी समाजासाठी आशेचा नवा प्रकाश
ऑल इंडिया जमेतुल कुरेश या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे राबविण्यात येणारा
“आधी रोटी काम खाऊ, अपने बच्चो को जरूर पढाओ – बेटी पढाओ, बेटी बचाओ”
हा उपक्रम आज कुरेशी समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे.
या उपक्रमामागील मूळ भावना अतिशय स्पष्ट आहे —
पोटभर अन्नासोबत हातात काम आणि डोक्यात शिक्षण.
विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर देत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संदेशातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
या समाजोपयोगी उपक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत
बिलाल भाई कुरेशी,
जे केवळ नावापुरते नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत आहेत.
गरजू कुटुंबांना मार्गदर्शन, शिक्षणासाठी प्रोत्साहन, पालकांमध्ये जनजागृती आणि समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
आज या उपक्रमामुळे अनेक कुटुंबे शिक्षणाकडे वळत असून,
कुरेशी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मोठे योगदान मिळत आहे.
👉 “शिक्षण हेच खरे शस्त्र आहे” हे सिद्ध करत
ऑल इंडिया जमेतुल कुरेश आणि बिलाल भाई कुरेशी
यांचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा