Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

*समाजसेवेचे चेहरा नेतृत्वाची ताकद अडवोकेट – सौ.कांचनमालाताई उत्कर्ष संगवे*

 *कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*

   *बिलाल कुरेशी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



यशस्वी व प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेवेसाठी परिसरात ओळखल्या जाणाऱ्या  अँड.सौ कांचनमालाताई उत्कर्ष संगवे या आज शिराढोण परिसरातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येत आहेत. कायदा, उद्योग आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कोरोना काळात संपूर्ण समाज संकटात असताना, कांचनमाला संगवे यांनी “सेवाच धर्म” मानून हॉस्पिटल मध्ये असलेल्या गरजू नागरिकांसाठी  टिफिन सेवा सुरू केली. उपाशीपोटी कोणीही राहू नये, या भावनेतून त्यांनी केलेल्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला. या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना ‘अन्नपूर्णा पुरस्कार’ सहित अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. कायद्याचे सखोल ज्ञान, ठाम भूमिका आणि माणुसकीचा दृष्टिकोन यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

आता शिराढोण जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्या एक उबाटा शिवसेना च्या तगडा उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्या उमेदवारीला समाजातील विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांनी मागील वेळेस जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या कार्याचा उल्लेख आज बी गावोगावी चर्चेत येत आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समाजसेवा, सक्षम नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेल्या अँड. सौ कांचनमालाताई संगवे यांचा हा राजकीय प्रवास शिराढोणच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा