Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

*बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीचा अपमान; निवडणुका पुन्हा घ्या! राहुल नार्वेकर यांचे* *विधानसभाध्यक्षपदावरून निलंबन करा. उद्धव ठाकरे यांची मागणी!*

 *मुख्यसंपादक -टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


मुंबई : देशातील लोकशाही संपून आता झुंडशाही सुरू झाली आहे. राज्यात कल्याण-डोंबिवली, ठाण्यासह बिनविराेध निवहणुकांची सुरू झालेली प्रक्रिया ही लोकशाहीचा अपमान करणारी असल्याचे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानापासून मतदारांना वंचित ठेवले जात असल्याने निवडणुका रद्द करून पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी केली. 

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याबद्दल संताप व्यक्त करताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अध्यक्षपदावरून निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना भवन येथे शिवसेना (ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा संयुक्त वचननामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकांबद्दल संतप्त प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपची मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया ते राबवत आहेत.

साम, दाम, दंड, भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते याआधी महाराष्ट्राला कधीही लाभले नसल्याची टीका त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांचा अधिकार सभागृहात, बाहेर ते राहुल नार्वेकर आणि आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून जनतेला दमदाटी करत आहे आणि संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वत: संरक्षणात राहून देत आहे, ही बाब आयोगाने गांभीर्याने घेऊन त्यांचे अध्यक्षपदावरू तत्काळ निलंबन करायलो. जनतेचे न्यायासन म्हणजे विधानसभा अध्यक्ष असतात. त्यांनी निष्पक्षपणे कारभार करण्याची जबाबदारी आहे. पण त्याला छेद देणारे वर्तन राहुल नार्वेकर यांचे आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

भाजपचे अमराठी उपमहापौर झाले

मुंबईचा महापौर मराठी व हिंदू होणार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, असा सवाल करताना आम्ही मराठी आहोत आणि अस्सल हिंदूच आहोत. आतापर्यंत शिवसेनेनेच मराठीच महापौर दिले आहेत. मात्र, भाजप शिवसेनेसोबत सत्तेत असताना उपमहापौर कोण केले होते, हे त्यांनी सांगावे असा टोला लगावताना भाजपने मुंबई महापालिकेवर अमराठी उपमहापौर दिल्याची आठवण करून दिली.

ठेवी वाटायला नसतात

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या ठेवी चाटायला नसतात या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. हे वक्तव्यच अशोभनीय असल्याचे सांगताना ठेवी या चाटायला नसतात. पण कान्ट्रॅक्टरचे बुट चाटून त्यांना वाटायलाही नसतात, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी भाजपने महापालिकेची विल्हेवाट लावायचे ठरवले असल्याची टीका त्यांनी केली. जमाखर्चाचा ताळमेळ साधून खर्च केला जातो. आपल्याकडे असलेली साधने आणि किती महसूल येणार याचा अभ्यास असतो. जिथे मुंबई महापालिकेचा १५ हजार कोटींची अर्थसंकल्पीय खर्चाची तरतूद आहे तिथे यांनी तीन लाख कोटींची देणी करून ठेवली आहेत. हा तीन लाख कोटींचा घोटाळा असल्याचे ठाकरे म्हणाले.

मुंबई अदानिस्तान करण्याचा डाव

मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीचे दालन करणार होतो. त्यांनी रद्द केले आणि विकासकाच्या घशात घातले. वरळी डेअरीतील कामगारांचे तिथेच पुनर्वसन करून तिथे पर्यटन केंद्र करणार होतो. ते त्यांनी रद्द करून विकासकाच्या घशात घातले जात आहे. मराठी भाषा भवन, कचऱ्यासाठी क्षेपणभूमी करणार होतो ती रद्द केली. मुंबईतील सर्व जमीन अदानीच्या घशात घातली जात आहे. उद्या भाजपाचा महापौर झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेच्या कामांचे श्रेय कशाला घेता!

'आम्ही केलेल्या कामांचे श्रेय चोरणारी अबोध बालकांची टोळी' या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना आम्ही मुंबईसाठी खूप छोट्या गोष्टी केल्या त्याचे श्रेय तुम्ही का घेता, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला. आम्ही सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) केला, मध्य वैतरणा धरण बांधले, ही छोटी कामे आम्ही केली.

२०१७ साली गारगाई-पिंजाळ धरण प्रस्तावित केले होते मात्र त्यात सहा लाख झाडांची कत्तल होणार हाेती म्हणून मुंबईसाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा निक्षारीकरण प्रकल्प आणला तो या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता, पण तो या सरकारने रद्द केला. अशी आम्ही छोटी कामे केली त्याचे श्रेय तुम्ही का घेता असा सवाल करताना त्यांनी उपरोधिक पणे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली, शिंदे आणि फडणवीस यांनी अरबी समुद्र निर्माण केला, अशी उपरोधिक टीका करताना त्यांनी अरबी समुद्रातून छत्रपती शिवरायांचे स्मारकही बाहेर काढावे असा टोला त्यांनी लगावला. यावेळी कोराेनाकाळातील कामाची पुस्तिका काढली होती तिला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला, असे सांगताना हे झाले तरी ज्या कामाचे जगभरात कौतुक झाले ते काम आपण जनतेसमोर मांडणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात

शिवसेना भवनात राज ठाकरे यांचे तब्बल २० वर्षांंनंतर आगमन झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवसेना भवनाच्या अनेक आठवणींना तेव्हा राज ठाकरे यांनी उजाळा दिला. १९७७ मध्ये जनता पक्षाच्या जाहीर सभेनंतर शिवसेना भवनावर झालेल्या दगडफेकीची आठवण त्यांनी वेळी करून दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा