*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
वसुनंदिनी फाउंडेशन व एम. के. व्हेंचर्स, जामनेर तसेच एम. व्हेंटोरिअल वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात करमाळा येथील उद्योजक क्लासिक ऑईल कंपनीचे मालक संतोष मुरलीधर कुलकर्णी यांना वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार–२०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कुलकर्णी यांनी व्यावसायिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासह समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात उत्साहात पार पडला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर सोनवणे व संस्थापक सचिव सी. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संतोष काका कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा