Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

*अरबाज नजीर तांबोळी यांचे अपघाती निधन कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर* *प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकर्तेपणाचा बळी*

 *कार्यकारी --संपादक*

*एस.बी.तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:--8378081147*



अकलूज येथील अरबाज तांबोळी या युवकाचा अपघाती मृत्यू... * अकलूज येथील अरबाज नजीर तांबोळी ह्या 21 वर्षाचा युवकाचा त्याच्या एका मित्रा सोबत कराड येथील सोळा पीर दरग्याचे दर्शन घेऊन परत येत असताना माळशिरस जवळच्या गोरड वाडी येथे अपघाताने मृत्यू झाला...

अरबाज तांबोळी याच्या अपघाती मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, आज सकाळी अकलूज येथील मुस्लिम दफन भूमी येथे त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले...

अरबाज तांबोळी याच्या मागे वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी व विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा परिवार असून अकलूजच्या हनुमान तालीम जवळ तो वास्तव्यास होता...

साखर कारखान्यांना ऊस घेवून जाणारे ट्रॅक्टर व ट्राॅल्या परीवहन विभागाच्या अटी, शर्ती व नियम सर्रास पायदळी तुडवत असतात. त्यामुळे ट्रॅक्टर व ट्राॅल्यांना परावर्तक तसेच रस्ता सुरक्षेचे नियम पाळणारी आयुधे नसल्याने नाहक नागरिकांना जिवाला मुकावे लागत आहे. यामुळे ऊस हंगामात प्रत्येक वर्षी अनेकांना हात, पाय तसेच जिवही गमवावा लागत आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग याबाबत ठोस अशी भूमिका घेत नाही. याबाबत काही गौडबंगाल आहे की काय असा संताप व्यक्त केली जात आहे.



     अरबाज तांबोळी यांच्या निधनाने त्याचे कुटुंब अक्षरशः उध्वस्त झाले असून त्याच्या कुटुंबातील कर्ता युवक हा एकमेव होता तो गेल्याने कुटुंब उघड्यावर पडला असून त्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा